SANDIP GULAVE या शैक्षणिक ब्लॉगवर आपले स्वागत आहे  .

Friday, June 20, 2025

योग दिन 21 जून

 योग दिन 

21 जून



शाळेमध्ये तसेच विद्यालयांमध्ये योग दिन साजरा करण्यासाठी बुकलेट डाऊनलोड करण्यासाठी खालील चित्राला टच करा


🎗️🎗️🎗️🎗️🎗️🎗️🎗️🎗️🎗️🎗️🎗️🎗️🎗️🎗️🎗️🎗️🎗️

योग दिन घोषवाक्य 


योग आहे आरोग्यासाठी क्रांती, 

नियमित योगामुळे जीवनात येते सुख-शांती


जो करेल योग, 

त्यापासून दूर राही रोग!!!!


योग असे जेथे;

 रोग नसे तेथे....


 योग असे जेथे. 

आरोग्य वसे तेथे.....


स्वयं को बदलो, जग बदलेगा।

 योग से सुखमय हर दिन खिलेगा।।


योग है स्वास्थ्य के लिए क्रांति। 

नियमित योग से जीवन मे हो सुख शांति ।।


जिसने योग अपनाया। 

रोग को हमेशा के लिए दूर भगाया।।


रोगमुक्क्त जीवन जीने की हो चाहत। 

नियमित योग करने की डालो आदत ।।


स्वास्थ्य जीवन जीना जिंदगी की जमा पूँजी। 

योग करना रोगमुक्क्त जीवन की कुंजी।


योग है स्वास्थ्य के लिए लाभकारी। 

योग रोगमुक्क्त जीवन के लिए गुणकारी।।

Sunday, June 8, 2025

इयत्ता 4 थी इयत्ता 7 वी प्रज्ञाशोध परीक्षा दिनांक २६/०३/२०२५ अंतिम निकालाबाबत.

 इयत्ता 4 थी इयत्ता 7 वी प्रज्ञाशोध परीक्षा दिनांक २६/०३/२०२५ अंतिम निकालाबाबत.



उपरोक्त संदर्भिय विषयानुसार सातारा जिल्हा परिषद यांचे वतीने सातारा जिल्हयातील जिल्हा परिषद शाळेत शिकणा-या इ. 4 थी व इ. 7 वी च्या विद्याथ्यांची प्रज्ञाशोध परीक्षा ही दिनांक 26 मार्च 2025 रोजी घेण्यात आली होती. या परिक्षेचा अंतरिम निकाल दिनांक 29/04/2025 रोजी जाहिर करण्यात आला होता.


दिनांक 02/05/2025 रोजी पर्यंत आलेले आक्षेप विचारात घेऊन अंतिम निकाल आज दिनांक 06/06/2025 रोजी जाहिर करण्यात येत आहे.

 https://www.eduzpsatara.com/Home/Result

 या संकेतस्थळावर भेट देवून निकाल पाहून पुढील आवश्यक ती कार्यवाही करण्यात यावी. यायावत संबधित विद्यार्थी, शिक्षक व पालक यांना अवगत करावे.

निकाल पाहण्यासाठी खालील चित्राला टच करा. 


कराड तालुका

💥 इयत्ता चौथी सीट नंबर ~

CLICK HERE 


💥 इयत्ता सातवी सीट नंबर ~

CLICK HERE 


🎗️🎗️🎗️🎗️🎗️🎗️🎗️🎗️🎗️🎗️🎗️🎗️🎗️🎗️🎗️🎗️🎗️🎗️

सातारा जिल्हा प्रज्ञाशोध परीक्षा इयत्ता चौथी पेपर व उत्तर सूची पाहण्यासाठी खालील चित्राला टच करा. 


🎗️🎗️🎗️🎗️🎗️🎗️🎗️🎗️🎗️🎗️🎗️🎗️🎗️🎗️🎗️🎗️

सातारा जिल्हा प्रज्ञाशोध परीक्षा इयत्ता सातवी पेपर व उत्तर सूची पाहण्यासाठी खालील चित्राला टच करा. 

🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫

तुम्हाला माझ्या शैक्षणिक व्हाट्सअप ग्रुपला जॉईन व्हायचे असेल तर खालील चित्राला टच करा ~

.

Friday, June 6, 2025

सन २०२५-२६ या वर्षामध्ये राज्यातील सर्व शाळांमधील विद्यार्थ्यांची माहिती यु-डायस प्लस प्रणालीमध्ये नोंदणीबाबत.

 सन २०२५-२६ या वर्षामध्ये राज्यातील सर्व शाळांमधील विद्यार्थ्यांची माहिती यु-डायस प्लस प्रणालीमध्ये नोंदणीबाबत.



विषयः सन २०२५-२६ या वर्षामध्ये राज्यातील सर्व शाळांमधील विद्यार्थ्यांची माहिती यु-डायस प्लस प्रणालीमध्ये नोंदणीबाबत.


संदर्भ: केंद्र शासनाचे पत्र क्र. D.O.No. २३-२/२०२५-Stats दि. ०३/०४/२०२५.


उपरोक्त संदर्भिय पत्रान्वये राज्यातील सर्व शाळांमधील विद्यार्थ्यांची माहिती यु-डायस प्लस प्रणालीत दि. ३० सप्टेंबर, २०२५ पर्यंत पूर्ण करण्यासाठी केंद्र शासनाकडून कळविण्यात आले आहे. त्यानुसार पुढील प्रमाणे कार्यवाही होणे आवश्यक आहे.


👉दि. ०१ मे, २०२५ पासून सर्व राज्यांकरिता यु-डायस प्लस २०२५-२६ करिता विद्यार्थ्यांची माहिती अद्ययावत करण्याची सुविधा सुरू झाली आहे.महाराष्ट्र राज्याची सन २०२४-२५ या वर्षाची अंतिम माहिती केंद्र शासनाला दि. १५ मे, २०२५ रोजी पाठविण्यात आली आहे. त्यानुसार महाराष्ट्र राज्यातील विद्यार्थ्यांची माहिती अद्ययावत करण्याची सुविधा दि. २१ मे, २०२५ पासून सुरू झाली आहे.


👉जिल्हा स्तरावरील संगणक प्रोग्रामर यांनी जिल्ह्याचे शिक्षणाधिकारी (प्राथमिक व माध्यमिक) यांच्या उपस्थितीमध्ये सभा आयोजित करून सदर सभामध्ये तालुक्याचे गटशिक्षणाधिकारी, MIS-Coordinator, Data Entry Operator, Civil Engineering, Civil Engineer, IED-Coordinator यांना विद्यार्थ्यांचे प्रमोशनबाबत प्रशिक्षण देण्यात यावे. त्याचप्रमाणे गटशिक्षणाधिकारी यांनी आपल्या स्तरावरून विस्तार अधिकारी, केंद्र प्रमुख आणि शाळेचे मुख्याध्यापक यांचे प्रशिक्षण आयोजित करावे.


👉जिल्हा स्तरावरील संगणक प्रोग्रामर व MIS-Coordinator यांना विद्यार्थ्यांचे प्रमोशन करताना शाळेच्या मुख्याध्यापकांकडून काही त्रुटी (Repeater, Over age, Under age) राहिल्याचे निदर्शनास आल्यास शाळेच्या मुख्याध्यापकांकडून त्रुटींची पूर्तता करून घेणेबाबत सूचना दयावी.


👉विद्यार्थ्यांची नोंदणी पूर्ण करण्यासाठी शाळेच्या मुख्याध्यापकांना शिक्षण घेणारे एक ही मूल Dropbox मध्ये / शाळाबाह्य राहणार नाही, याची खात्री करण्यासाठी सूचना देण्यात याव्यात. शाळेमध्ये विद्यार्थी Import करित असतांना तांत्रिक अडचणी आल्यास तालुक्याचे MIS-Coordinator यांच्याशी मुख्याध्यापकांनी संपर्क साधवा.


👉सर्व शाळांमधील विद्यार्थ्यांचे प्रमोशन दि. ३० जून, २०२५ पर्यंत पूर्ण करणे आवश्यक आहे. प्रमोशन पूर्ण झाल्यानंतर पूर्व प्राथमिक व इयत्ता १ली च्या विद्यार्थ्यांची नोंद करण्यासाठी सुविधा सुरू करण्यात येईल.


तरी कृपया सन २०२५-२६ यु-डायस प्लस प्रणालीतील माहिती विहित मुदतीत नोंदविली जाईल यासाठी आपल्या स्तरावरून पुढील कार्यवाही होणेस विनंती.

.

🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫

सदर परिपत्रकाची PDF DOWNLOAD पाहण्यासाठी खालील चित्राला टच करा 


🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫

तुम्हाला माझ्या शैक्षणिक व्हाट्सअप ग्रुपला जॉईन व्हायचे असेल तर खालील चित्राला टच करा ~

.

Thursday, June 5, 2025

प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजनेंतर्गत शाळांमध्ये परसबाग उपक्रमास प्रोत्साहन देण्याकरीता स्पर्धा आयोजित करण्याबाबत.....

 प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजनेंतर्गत शाळांमध्ये परसबाग उपक्रमास प्रोत्साहन देण्याकरीता स्पर्धा आयोजित करण्याबाबत.....



प्रस्तावना:-


केंद्र शासनाने प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजनेंतर्गत शाळांमध्ये परसबागा निर्माण करुन सदर परसबागांमधून उत्पादित भाजीपाला व इतर पदार्थांचा समावेश शालेय पोषण आहारामध्ये करण्याचे निर्देश दि. १५ ऑक्टोबर, २०१९ रोजीच्या मार्गदर्शक सूचनांनुसार दिले आहेत. त्यानुषंगाने विद्यार्थ्यांनी परसबागेत पिकवलेला भाजीपाला, फळे इत्यादींचा समावेश शालेय पोषण आहारात करुन विद्यार्थ्यांना योजनेचा लाभ देण्यात येत आहे. परसबाग निर्मितीमुळे विद्यार्थ्यांची निसर्गाशी जवळीक निर्माण होवून त्यांना नवनिर्मितीचा आनंद मिळणे, ताज्या भाजीपाल्याचा समावेश पोषण आहारात होवून विद्यार्थ्यांना पौष्टिक आहार उपलब्ध होणे असे विविध चांगले हेतू या उपक्रमामुळे साध्य होत आहेत. प्रस्तुत योजनेंतर्गत परसबाग उपक्रम प्रभावीपणे राबविण्यासाठी मागील शैक्षणिक वर्षामध्ये शासनाने उत्कृष्ट परसबाग स्पर्धा आयोजित केली होती. त्याचा परिणाम म्हणून राज्यामधील सुमारे ६८,७०४ शाळांमध्ये परसबागा निर्माण झालेल्या आहेत. राज्यातील सर्व शाळांमध्ये परसबागा निर्माण करण्याचे उद्दिष्ट निर्धारित केले आहे. त्यानुषंगाने राज्यामध्ये प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजनेंतर्गत सन २०२५-२६ या शैक्षणिक वर्षामध्येही पसरबाग उपक्रमास प्रोत्साहन देण्याकरीता परसबाग स्पर्धांचे आयोजन करण्याची बाब विचाराधीन होती.


शासन निर्णय :-


प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजनेंतर्गत राज्यातील सर्व पात्र शाळांमध्ये परसबागा निर्माण करण्यास प्रोत्साहन मिळण्यासाठी खालीलप्रमाणे निर्णय घेण्यात येत आहेत.


i. राज्यातील सर्व शाळांमध्ये परसबागा निर्माण करुन सदर परसबागांमधून उत्पादित ताजा भाजीपाला यांचा वापर शालेय पोषण आहारामध्ये करण्यात यावा.


ii. प्रस्तुत उपक्रमाकरीता शाळांनी नजिकचे कृषि विज्ञान केंद्र, कृषि शाळा, कृषि विभागातील कृषि सहायक / पर्यवेक्षक, कृषि क्षेत्रात काम करणाऱ्या अशासकीय संस्था (NGO), सेंद्रिय शेती करणारे पालक, शेतकरी, कृषि तज्ज्ञ यांचे मार्गदर्शन व सहकार्य घेण्यात यावे.


iii. राज्यात उत्कृष्ट परसबागा तयार होण्यासाठी सदर परसबाग उपक्रमास प्रोत्साहन देणे आवश्यक आहे. याकरीता उत्कृष्ट परसबाग स्पर्धांचे तालुका व जिल्हास्तरावर आयोजन करण्यात यावे. त्यादृष्टीने उत्कृष्ट परसबाग स्पर्धेकरीता खालीलप्रमाणे बक्षिसांची रक्कम निश्चित करण्यास मान्यता देण्यात येत आहे.



iv. प्रस्तुत परसबाग स्पर्धेचे मुल्यांकन करण्यासाठी शिक्षण, कृषी, आरोग्य, विभागातील अधिकारी तसेच, आहारतज्ज्ञ व स्थानिक प्रगतीशील शेतकरी यांची समिती गठीत करण्यात यावी. तसेच, उत्कृष्ट परसबागांचे मुल्यांकन पुढील निकषांच्या आधारे करण्यात यावे.



V. तालुका स्तरावरील स्पर्धेचे मूल्यांकन करुन माहे ऑक्टोंबर, २०२५ अखेर तालुका स्तरीय विजेत्या शाळांची नावे संबंधित गटशिक्षणाधिकारी/अधिक्षक (शापोआ) यांनी घोषित करावीत. तसेच, तालुका स्तरावरील प्रथम क्रमांक विजेत्या शाळेतील परसबागेची तपासणी करुन जिल्हास्तरीय स्पर्धेचा अंतिम निकाल नोव्हेंबर, २०२५ अखेर जाहीर करण्याची जबाबादारी संबंधित जिल्ह्यांचे शिक्षणाधिकारी (प्राथ.) यांची राहील.


vi. सदर स्पर्धा विहित कालमर्यादेत पूर्ण होण्यासाठी क्षेत्रिय स्तरावर आवश्यक त्या सविस्तर सूचना देण्याची कार्यवाही शिक्षण संचालक (प्राथ.) महाराष्ट्र, राज्य, पुणे यांनी करावी.


vii. प्रस्तुत उपक्रमाकरीता येणारा खर्च सन २०२५-२६ या आर्थिक वर्षाकरीता केंद्र शासनाने योजनेंतर्गत व्यवस्थापन, संनियंत्रण व मुल्यमापन (MME) या घटकासाठी मंजूर केलेल्या निधीमधून अदा करण्यास शिक्षण संचालक (प्राथ.) यांना मान्यता देण्यात येत आहे. विजेत्या शाळांना त्यांची बक्षिसाची रक्कम माहे डिसेंबर, २०२५ अखेर अदा करण्याची दक्षता शिक्षण संचालक (प्राथ.) यांनी घ्यावी.


प्रस्तुत शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आले असून त्याचा संकेताक २०२५०६०५१४५२३९४५२१ असा आहे. सदर शासन निर्णय डिजीटल स्वाक्षरीने साक्षांकित करुन काढण्यात येत आहे.


महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने.

🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫

सदर परिपत्रकाची PDF DOWNLOAD पाहण्यासाठी खालील चित्राला टच करा 


🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫

तुम्हाला माझ्या शैक्षणिक व्हाट्सअप ग्रुपला जॉईन व्हायचे असेल तर खालील चित्राला टच करा ~

.