SANDIP GULAVE या शैक्षणिक ब्लॉगवर आपले स्वागत आहे  .
Showing posts with label पंडित जवाहरलाल नेहरू निबंध. Show all posts
Showing posts with label पंडित जवाहरलाल नेहरू निबंध. Show all posts

Wednesday, November 9, 2022

पंडित जवाहरलाल नेहरू निबंध

⚜️ पंडित जवाहरलाल नेहरू निबंध ⚜️




                पंडित जवाहरलाल नेहरू यांचा जन्म 14 नोव्हेंबर 1889 रोजी अलाहाबाद येथे झाला. त्यांच्या वडिलांचे नाव मोतीलाल होते तर आईचे नाव स्वरूपराणी असे होते.

              पंडित जवाहरलाल नेहरू यांचे वडील अलाहाबाद येथे खूप मोठे वकील होते. आपल्या मुलाने खूप मोठे बनावे ह्या इच्छेने वयाच्या सोळाव्या वर्षी जवारलाल यांना इंग्लंड येथे त्यांनी शिकण्यास पाठविले.

                इंग्लंडहून शिकून आल्यावर जवाहरलाल अलाहाबाद मध्ये वकिली करू लागले. थोड्या काळात कामाच्या निमित्ताने काही गरीब शेतकऱ्यांशी त्यांची भेट झाली. त्यांची दशा पाहून जवाहरलाल अस्वस्थ झाले त्यातच 1920 साली त्यांची महात्मा गांधी यांच्याशी भेट झाली. तेव्हा गांधीजींच्या विचारांनी भारावून जाऊन जवाहरलाल आणि मोतीलाल ह्या दोघांनी वकिली सोडून स्वातंत्र्यलढ्यात उडी घेतली.

                गांधीजींनी जवाहरलाल यांच्यातील गुण ओळखून आपले शिष्य म्हणून तयार केले. पुढे स्वातंत्र्य मिळाल्या वर पंतप्रधान म्हणून पंडित जवाहरलाल नेहरू यांचे नाव सर्व जनतेने मान्य केले.

               पंडित नेहरू यांचे लहान मुलांवर खूप प्रेम होते. लहान मुले त्यांना चाचा म्हणून हाक मारीत. त्यांचा जन्मदिन 'बालदिन' म्हणून आज ही साजरा केला जातो. मुलांप्रमाणे गुलाबाचे फुलही चाचा नेहरूंना खूप आवडायचे.

             त्यांच्या कार्याची दखल घेऊन भारत सरकारने त्यांना 1952 साली 'भारतरत्न' हा किताब देऊन सन्मानित केले. आधुनिक भारताच्या जडणघडण करण्यात पंडित नेहरूंनी जे योगदान दिले ते अविस्मरणीय असेच आहे. चाचा नेहरूंचा मृत्यू 27 मे 1964 मध्ये झाला.

🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫


पंडित जवाहरलाल नेहरू निबंध क्रमांक 2 वाचण्यासाठी खालील चित्राला टच करा.



🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫


पंडित जवाहरलाल नेहरू यांची संपूर्ण माहिती वाचण्यासाठी खालील बटनाला टच करा.



🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫

पंडित जवाहरलाल नेहरू यांचा जीवन परिचय युट्युब व्हिडिओ पाहण्यासाठी खालील चित्राला टच करा.


🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫
पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या जीवनावर आधारित सराव चाचणी सोडवण्यासाठी खाली टच करा.