माझा आवडता खेळ {खो- खो}
लहान मुलांना खेळ खूप प्रिय असतो. साहजिकच मलाही खेळ खूप आवडतात. माझे बाबा म्हणतात की मुलांनी भरपूर खेळले पाहिजे. अंगमेहनत केली पाहिजे. त्यामुळे शरीरात ताकद येते. स्नायू बळकट होतात आणि मुलांची वाढ ही चांगली होते. माझे मित्रही माझ्यासोबत आवडीने खेळत असतात.
मला खो-खो हा खेळ खूप आवडतो. या खेळामध्ये दोन संघ असतात. प्रत्येक संघात बारा खेळाडू असतात. त्यापैकी एका वेळेस नऊ खेळाडू मैदानात उतरतात. खो-खो चे मैदान आयताकृती आखलेले असते. भाग घेणारी मुले गुडघ्यावर खाली बसतात. एक आड एक खेळाडू विरुद्ध दिशेला तोंड करून बसतो. दोन्ही संघापैकी जो संघ कमीत कमी वेळात दुसऱ्या संघातील सर्व खेळाडूंना खो देण्यात यशस्वी होतो तो संघ जिंकतो.
आमची शाळा आंतरशालेय खो-खो स्पर्धेमध्ये भाग घेते आणि आम्हाला बरेचदा फिरता चषक मिळतो मी शाळेच्या खो-खोच्या संघात आहे आम्ही जिंकलो की सर्वांना खूप आनंद होतो रोज सकाळी मी शाळेत खो-खोच्या सरावासाठी जातो खूप खूप खेळल्यामुळे अभ्यास मागे पडला असे कोणी म्हणून नाही म्हणून मी रात्रीचा अभ्यास करून ठेवतो खोखो या खेळामुळे माझा खूप व्यायाम होतो.
असा हा माझा खो खो खेळ मला फार आवडतो.
⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️
माझा आवडता खेळ क्रिकेट निबंध पाहण्यासाठी खाली टच करा.
👇