शुद्ध व अशुद्ध शब्द ओळखणे
व्याकरणातील नियमांना अनुसरून केलेल्या निर्दोष लेखनाला शुद्धलेखन म्हणतात. अर्थपूर्ण शुद्धलेखनासाठी अनुस्वार, रस्व, दीर्घ व जोडाक्षरे इत्यादींचे ज्ञान असणे आवश्यक आहे. त्यासाठी शुद्धलेखनाचे काही नियम अभ्यासा.
पाठ्यपुस्तकातील चित्रे, शब्द यातील शब्द रूपाने शुद्ध लिहिणे. शब्द अचूक ओळखणे, शोधणे यासाठी पाठ्यपुस्तकांतील शब्दांच्या उच्चाराचा सराव करावा.
1) अनुस्वार - नाकातून स्पष्ट होणाऱ्या उच्चाराला 'अनुस्वार' म्हणतात. हा अनुस्वार त्या अक्षरावर एक टिंब किंवा बिंदू () देऊन दाखवला जातो.
उदा. रंग, गंध, चंदन, बंद, अंधार
2) हस्व-दीर्घ - खालील शब्द मोठ्याने वाचा. उदा. ती, मी, ताई, दिवाळी, होडी, चिमणी, कापूस, गुळ, माणुस वरील शब्दांतील अधोरेखित अक्षरांच्या शेवटी 'ई' व 'ऊ' हे स्वर आले आहेत, ते दीर्घ लिहावेत. खालील शब्द मात्र 'हस्वान्त' लिहावेत.
उदा. आणि, अति, परंतु, इति, नि, तथापि
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
माझ्या शैक्षणिक व्हाट्सअप ग्रुप ला जॉईन होण्यासाठी ~ CLICK HERE