SCHOOL MAPPING
School Mapping बाबत माहिती
(सदर माहिती युजर मॅन्युअल नुसार आहे)
तुम्हाला जर मॅन्युअल (Manual) डाऊनलोड करायचे असेल तर ~
🎗️ सर्वप्रथम मोबाईल हा अँड्रॉइड असावा.
🎗️ प्ले स्टोअर ला जाऊन उजव्या बाजूला प्रोफाइल आयकॉनवर क्लिक करून Play Protect वर क्लिक करावे. या मधील protect setting pause करण्यासाठी
तेथील दोन्ही ऑप्शन बंद करावेत
🎗️ ऑप्शन बंद केल्यानंतर Turn Off या बटनवर क्लिक करावे.
🎗️ त्यानंतर व्हॉट्स अँप वर पाठवलेली Schoolmapping.apk
Open करावी. Install या बटण वर क्लिक करावे. शेवटी Done वर क्लिक करावे.
🎗️ आता आपल्या मोबाईल मध्ये इन्स्टॉल झालेले ॲप ओपन करावे.
त्यावेळी ॲप परमिशन मागील अशा सर्व परमिशन्स च्या वेळी Allow ( Allow All ) त्यानंतर while using the app या वर क्लिक करावे .
🎗️ Allow access to manage all files हा Option On करावा.
🎗️ त्यानंतर लॉगिन पेज ओपन होईल तेथे मुख्याध्यापक यांचा मोबाईल नंबर जो U dise वर नोंद केलेला आहे तो टाकावा, किंवा U dise क्रमांकाने ही लॉगिन करता येते.
🎗️ जर तुम्ही यु-डायस टाकून लॉगिन होत असाल तर स्क्रीनवर आलेली माहिती भरावी.
🎗️ एक ओटीपी मुख्याध्यापक यांना प्राप्त होईल तो टाकून कन्फर्म ओटीपी या बटन वर क्लिक करावे.
🎗️ Login successful असे लिहून आल्यावर ओके या बटणावर क्लिक करावे.
🎗️ त्यानंतर आपल्या डोळ्यासमोर डॅशबोर्ड ओपन होईल त्यातील School mapping या बटन वर क्लिक करावे.
शाळेची माहिती आपल्या डोळ्यासमोर दिसेल.
🎗️वापरकर्त्यांना Get Location बटणावर क्लिक करून location माहिती (अक्षांश आणि रेखांश, अचूकता, तारीख आणि वेळ) घ्यावी लागेल.
🎗️कृपया Accuracy मजकूर बॉक्स तपासा. Accuracy १० मीटरपेक्षा कमी असावी. जर accuracy १० मीटरपेक्षा जास्त असेल, तर वापरकर्ता location information लॉक करू शकणार नाही.
हवी असलेली Accuracy मिळाल्यानंतर, वापरकर्ता कॅमेरा आयकॉनवर क्लिक करून फोटो घेऊ शकतो.
🎗️ त्यानंतर शाळेतील सहा फोटो अपलोड करावयाचे आहेत. *फोटो हे मोबाईल आडवा करून काढावेत.*
🎗️ पहिला फोटो हा शाळा व शाळेचे नाव असलेल्या बोर्ड सह असावा.
🎗️ दुसरा फोटो हा शाळेतील जनरल व्ह्यू स्वरूपातील असावा.
🎗️ तिसरा फोटो हा किचन शेड चा असावा.
🎗️ चौथा फोटो हा पिण्याच्या पाण्याची व्यवस्था या स्वरूपातील असावा.
🎗️पाचवा फोटो हा मुलांच्या टॉयलेट एरिया फॅसिलिटी चा असावा. ( Optional)
🎗️ सहावा फोटो हा मुलींच्या टॉयलेट एरिया फॅसिलिटी जवळचा असावा.
🎗️ सर्व सहा फोटो घेतल्यानंतर मुख्याध्यापक यांनी रिमार्क लिहावा.
🎗️सर्व प्रक्रिया झाल्यानंतर Save बटन वर क्लिक करावे व त्यानंतर send बटन वर क्लिक करावे. शेवटी successful असा मेसेज येईल.
🎗️ज्या शाळेमध्ये इंटरनेट सुविधा उपलब्ध नसेल त्यांनी इंटरनेट किंवा रेंजमध्ये आल्यानंतर send manager या ऑप्शनवर क्लिक करून डोळ्याचे चिन्ह पहावयास मिळेल त्यावर माहिती चेक करून बाजूला असलेल्या Arrow वर क्लिक करावे.
🎗️आपण भरलेली माहिती पहावयास मिळेल.
किचनशेड फोटो बाबत ~
1) ज्या ठिकाणी सेंट्रल किचन आहेत अशा ठिकाणी शाळेतील पोषण आहार बाबतचा फोटो अपलोड करणे अपेक्षित आहे व Remark मध्ये "Central Kitchen" नमूद करणे आवश्यक आहे
2) या शाळांमध्ये पोषण आहार योजना लागू नाही या शाळांनी शाळेतील फोटो अपलोड करून Remark मध्ये "Not Applicable" नमूद करणे आवश्यक आहे.
ॲप कसे डाऊनलोड करावे याचा व्हिडिओ पाहण्यासाठी ~
No comments:
Post a Comment