⚜️ आरशातील प्रतिमा ⚜️
आपण दररोज आरसा वापरतो. आपली प्रतिमा आरशामध्ये दिसते. आपण तिचे कधी काळजीपूर्वक निरीक्षण केले आहे का? प्रत्यक्षात आपली आणि आपली आरशातील प्रतिमा यामध्ये काय बदल दिसतो? आपले डोके आणि आपले हात त्यांचे निरीक्षण केल्यास आपल्याला असे दिसून येते की, आपले डोके वरच्या बाजूला तसेच आहे. पण आपला उजवा हात आरशाच्या प्रतिमेच्या डावीकडे दिसतो. आणि आपला डावा हात प्रतिमेच्या उजवीकडे दिसतो.
⚜️ एखाद्या वस्तूची किंवा आकृतीचे आरशातील प्रतिमा पाहताना मूळ वस्तूची डावी व उजवी बाजू यांची अदलाबदल झालेली दिसते.
⚜️ या प्रकारच्या प्रश्नात अक्षर, अंक आणि आकृत्यांचा वापर केलेला असतो. आरशातील प्रतिमेमुळे विद्यार्थ्यांचे विचार क्षमता, निरीक्षण क्षमता आणि तर्क क्षमता वाढण्यास मदत होते.
⚜️ इंग्रजीतील A , H , I , M , O , U , T , V , W , X , Y या अक्षराच्या आरशातील प्रतिमेत काहीही फरक होत नसतो.
⚜️ अंकांचा / अक्षरांचा वापर 👉
या प्रश्न प्रकारात अंकी प्रतिमा साठी मराठी अंक एक अंकी, दोन अंकी किंवा इंग्रजी एक अंकी, दोन अंकी संख्यांचा वापर केला जातो.
अक्षरी प्रतिमांसाठी मराठी मुळाक्षरे किंवा इंग्रजी अक्षरांचा वापर करून प्रश्न विचारले जातात. या प्रश्नांची आरशातील प्रतिमा शोधण्यासाठी चार पर्याय क्रमांक दिले जातात.
⚜️ आकृत्यांचा वापर 👉
या प्रश्न प्रकारात आकृत्यांचा वापर केला जातो किंवा घड्याळाचाही वापर केला जातो एखादी चित्र अथवा आकृती देऊन त्याची आरशातील प्रतिमा ओळखण्यास सांगितले जाते.
🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️
आरशातील प्रतिमा हा घटक ट्रिकने समजण्यासाठी खालील व्हिडिओ पहावा.
तुम्हाला जर आरशातील प्रतिमा या घटकावरील सराव चाचणी सोडवायचे असेल तर खालील बटनाला टच करा
No comments:
Post a Comment