⚜️ बंकिमचंद्र चटर्जी यांची माहिती ⚜️
बंगालमधील चोवीस परगणा या जिल्ह्यातील कांतलपारा या गावी बंकीमचंद्र चटर्जी यांचा जन्म 26 जून 1838 रोजी झाला. त्यांचे घराणे अतिशय संपन्न असे होते. त्यांचे वडील मेदिनीपूर येथे डेप्युटी कलेक्टर होते. त्यांचे प्राथमिक व संस्कृत शिक्षण घरी करून घेतले. माध्यमिक शिक्षण गावातल्या हायस्कूलमध्ये झाले. उच्च शिक्षण हुगळीच्या महासीन महाविद्यालयात घेतले. नंतर कलकत्त्याच्या प्रेसिडेन्सी कॉलेजमधून ते बी. ए. झाले. त्यानंतर त्यांनी क कायद्याची परीक्षा दिली आणि त्यांना डेप्युटी मॅजिस्ट्रेटची नोकरी मिळाली.
वयाच्या २७ व्या वर्षी त्यांनी बंगाली साहित्याची सेवा करण्यास सुरुवात केली. त्यांनी लिहिलेली पहिली ऐतिहासिक कादंबरी म्हणजे 'दुर्गेशनंदिनी' होय, १८७२ मध्ये त्यांनी 'बंगदर्शन' नावाचे मासिक सुरू केले. त्यामधून त्यांनी आपली कादंबरी क्रमशः सुरू केली. १८६५ ते १८८७ या काळात त्यांनी एकूण १४ कादंबऱ्या लिहिल्या. सामाजिक व ऐतिहासिक विषयाच्या माध्यमातून अनेक विषयांवर प्रकाश टाकला, कपालकुंडला, विषवृक्ष, मृणालिनी, आनंदमठ अशांसारख्या कादंबऱ्यांमुळे त्यांना अमाप लोकप्रियता मिळाली. याशिवाय त्यांनी ऐतिहासिक, धार्मिक, चर्चात्मक, तात्विक निबंध लिहिले. कथा, काव्य लिहन, बंगाली भाषा समृद्ध केली. त्यांना आधुनिक बंगाली साहित्याचे निर्माते असे म्हणतात.
बंकीमचंद्र हे गुरूदेव रवींद्रनाथ टागोर यांना गुरुस्थानी मानत होते. रवींद्रनाऱ्यांचा त्यांच्या हृदयावर सखोल परिणाम झाला होता. "आनंदमठ' ही बंकीमचंद्रांची अत्यंत लोकप्रिय अशी कादंबरी. याच कादंबरीत 'वंदे मातरम्' हे गीत आहे. हे गीत भारतमातेचे स्वातंत्र्यलढ्याचे राष्ट्रगीत झाले. हे गीत संस्कृत व बंगाली भाषेत आहे. 'आनंदमठ' या कादंबरीचा नायक 'भावानंद' हा जंगलातून फिरत असताना त्याच्या मुखी असलेले है गीत होय. समाजमनावर या गीताचा फार परिणाम झाला.
१९०५ साली लॉर्ड कर्झनने बंगालची फाळणी केली. त्यामुळे साऱ्या देशात संतापाची लाट निर्माण झाली. त्यावेळी लोकांच्या मनात 'वंदेमातरम्' हे गीत गुंजत होते. प्रत्येक जण भारतमाता पारतंत्र्यातून मुक्त झाली पाहिजे असा विचार करू लागला. अनेकांनी हे गीत गात गात अंगावर लाक्या, छातीवर बंदुकीच्या गोळ्या हसत हसत झेलल्या.
बंकीमचंद्रांचे 'वंदे मातरम्' हे आज राष्ट्रगीत झाले आहे. आज या गीतामुळे प्रत्येकाच्या हृदयात भारतमातेबद्दल प्रेमाच्या भावना निर्माण होतात व प्रत्येक जण त्यांच्या चरणाशी नतमस्तक होतो. अशा या थोर महामानवाचा मृत्यू 8 एप्रिल 1894 रोजी झाला.
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
इतर महामानवांची माहिती पाहण्यासाठी खालील बटनाला टच करा.
No comments:
Post a Comment