डॉ बाबासाहेब आंबेडकर चारोळी / चारोळ्या
भाषण व निबंधासाठी उपयुक्त अशा चारोळ्या
करून जीवाचे रान,
दिला सर्वांना समतेचा मान,
अशी भीमरावांची शान,
भल्याभल्यांची झुकते बाबासाहेबांपुढे मान....
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
सर्वसामान्यांचा आधार,
भारतीय संविधानाचे शिल्पकार,
त्या ज्ञानसूर्याने दूर केला,
दीनदलितांच्या जीवनातील अंधार....
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
अंधार दाटला फार,
आता दिवा पाहिजे...
नव्या या युगात,
सूर्य नवा पाहिजे...
जातीपातीत विखुरलेल्या या मायभूमीला,
पुन्हा एकदा भिमाईचा भिवा पाहिजे...
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
जरी वेगळ्या भाषा असल्या,
तरी एकता कायम आहे,
बाबासाहेबांनी दिलेल्या संविधानात,
समानतेचा नियम आहे....
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
भारतरत्न बाबासाहेबांचे,
कर्तृत्व आहे मोठे,
त्यांच्यापुढे वाटतात,
चंद्र- सूर्यही छोटे..
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
नमन त्या पराक्रमाला,
नमन त्या देशप्रेमाला,
नमन त्या ज्ञानसूर्याला,
नमन त्या बाबासाहेबांना....
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
• अंधा-या घरात,
पेटवल्या ज्ञानाच्या ज्योती,
जगभर गाजत आहे,
बाबासाहेबांची कीर्ती...
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
असा मोहरा झाला नाही,
पुढे न होणार,
बाबासाहेबांचे नाव,
सतत गर्जत राहणार....
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
सलाम त्या महामानवाला,
शून्यातून केली सुरुवात,
अमर राहिले इतिहासात,
बाबासाहेब त्यांचे नाव ....
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
बुद्धा सारखं होत ज्ञान
देऊन गेले संविधान
मिळवून दिले समाजात स्थान
बाबासाहेब आमुचे प्राण.....
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
डोळ्यांमधून कोसळणाऱ्या
आसवांना आज मुभा आहे
कारण "बाबासाहेब" तुमच्यामुळेच
मी आज स्वाभिमानाने उभी आहे.
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
होता सिंहासारखा बाबा अमुचा
नव्हती त्याला कोणाची भीती
अरे होऊन गेली वर्षे जरी ही किती
आज ही बोलावते आम्हाला ती
चैत्यभूमीची माती
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
" दलितांचे कैवारी तुम्ही
गोरगरीबांचे उध्दारक तुम्ही
बाबासाहेब तुमच्या कर्तृत्वामुळे
सर्वांना मिळाली जगण्याची हमी."
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
कुरून जीवाचे रान
दिला सर्वांना समतेचा मान
अशी भीमरावांची शान
लिहिले भारताचे संविधान."
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
अंधार होता ज्यांच्या नारीबी
त्यांना प्रकाशाचं दान दिलं
तुमचे मानावे किती उपकार
बाबासाहेब तुम्हीच देशाला संविधान दिलं."
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
• मोजू तरी कशी उंची,
तुमच्या कर्तृत्वाची,
तुम्ही जगाला शिकवली,
भाषा माणुसकीची
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
आले किती गेले किती,
उडून गेले भरारा,
संपला नाही अन् संपणार नाही,
माझ्या भीमाचा दरारा....
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
फुलांची कहाणी वसंताने लिहीली
रात्रीची कहाणी ताऱ्यांनी लिहीला
आम्ही नाही कोणाचे गुलाम
कारण आमच्या आयुष्याची कहाणी
बाबासाहेबांनी लिहीली
जय भीम !
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
कुराण सांगतं मुसलमान व्हा
बायबल सांगतं ख्रिश्चन व्हा
भगवदगीता सांगतं हिंदू व्हा
पण माझ्या बाबासाहेबांचं
संविधान सांगतं मनुष्य व्हा
जय भीम
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
हे सारं आयुष्य ज्यांच्या शरणास
आमचं नमन आहे बाबांच्या चरणास
पूजेच्या योग्य आहेत बाबा आमच्या नजरेस
चला मिळून वाहूया फुलं बाबांच्या चरणास
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
सत्याला मित्रांनो कधी सोडू नका
आपल्या वचनांना तोडू नका
जे विसरले भीमाच्या उपकारांना
अशा लोकांशी नातं जोडू नका
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा जीवन परिचय व्हिडिओ पाहण्यासाठी खालील बटनाला टच करा.
No comments:
Post a Comment