👭 महिला दिन मराठी चारोळी 👭
ज्याला स्त्री आई म्हणून कळली,
तो जिजाऊंचा शिवबा झाला !!
ज्याला स्त्री बहीण म्हणून कळली,
तो मुक्ताई चा ज्ञानदेव झाला !!
ज्याला स्त्री मैत्रीण म्हणून कळली,
तो राधेचा श्याम झाला !!
आणि ज्याला स्त्री पत्नी म्हणून कळली,
तो सीतेचा राम झाला !!
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
प्रतिभेला तुझ्या नवे पंख मिळू दे…
स्वप्नांना तुझ्या नवी क्षितिज लाभू दे…
महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा…
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
नभी झेपावणारी तू पक्षिणी…
सक्षम कर्तव्यदक्ष तू गृहिणी…
प्रसंगी कडाडणारी तू सौदामिनी…
शत्रूस धूळ चारणारी तू रणरागिणी…
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
स्त्री म्हणजे वात्सल्य!
स्त्री म्हणजे मांगल्य!!
स्त्री म्हणजे मातृत्व!
स्त्री म्हणजे कर्तुत्व!!
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
तुम्ही भाऱ्या, भगिनी, दुहिता,
कित्येक वीरांच्या माता !
तुम्ही नवयुगाची प्रेरणा,
या जगताच्या भाग्यविधात्या !!
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
गंभीर नाही तर खंबीर आहे !
वार नाही तर तलवार आहे !!
बोठलेली नाही तर धार आहे !
स्त्री म्हणजे राख नाही तर,
पेटता अंगार आहे!!
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
आदिशक्ती तू, प्रभूची भक्ती तू,
झाशीची राणी तू, मावळ्यांची भवानी तू,
प्रयत्नांना लाभलेली उन्नती तू,
आजच्या युगाची प्रगती तू.
जागतिक महिला दिनाच्या शुभेच्छा.
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
शांत राहणे हा स्त्रीच्या स्वभावाचा भाग आहे !
वरूनी जरी पाणी असले तरी ती आतून आग आहे !!
वागणे तिचे एकदम कडक आणि सक्त आहे !
कारण तिच्या अंगात आई जिजाऊ चे रक्त आहे !!
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
लक्ष्मीबाईने झाशीचा किल्ला लढवला !!
जिजाऊने राजा शिवछत्रपती घडवला !
महाराणी ताराबाईने महाराष्ट्र भूमीत औरंगजेब रडवला !!
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
तुझ्या प्रयत्नांना मिळू दे,
यशाची सोनेरी किनार !
लक्ष लक्ष दिव्यांनी उजळू दे,
तुझा संसार !!
कर्तुत्व अन सामर्थ्याची,
ओढून घे नवी झालंर
स्त्री शक्तीचा होऊ दे,
पुन्हा एकदा जागर…
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
घरामधल्या घरपणाचा आधार असते नारी,
सौंदर्याचा हृदयावरला थरार असते नारी,
ईश्वराची मानवतेला भेट असते नारी,
जगण्यामधल्या आपुलकीचे बेट असते नारी.
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
ती जन्माला येतानाच घेऊन येते प्रेम आणि माया,
कुठल्याच स्त्रीचा जन्म कधीच जात नसतो वाया !
कधी मुलगी, कधी पत्नी, कधी आई होत असते,
सासर माहेर उजळविणारी स्त्री एक ज्योत असते !!
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
थेंबा थेंबा मधून येथे,
सामर्थ्याचा सागर व्हावा !
विश्वाच्या कल्याणासाठी,
स्त्रीशक्तीचा जागर व्हावा !!
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
महिला मुक्तीची ही भाषा, फक्त आज पुरतीच नको,
उत्सव आहे महिलांचा, म्हणून फक्त आरती नको !
ओठातला आणि पोटातला तुझा आवाज जन्माला घाल,
तेव्हाच सुरू होईल तुझ्या नव्या युगाची वाटचाल !!
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
स्त्री म्हणजे एक वाट,
अशक्य ते शक्य करून दाखवणारी,
अन्यायाला न्याय मिळवून देणारी,
अन् स्व-सुखाचा त्याग करून,
दुःखांना कवटाळणारी.!!
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
स्त्री म्हणजे विश्वास, अन् प्रगतीची खात्री,
तळपत्या उन्हात, डोईवर मायेची छत्री !
स्त्री म्हणजे मंद प्रकाश, न नुसत्या ज्वाला,
प्रेम आपुलकी अन् मायेचा जिव्हाळा !!
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
कित्येक रुपे तुझी असती
त्यात प्रेमाचा कळस तू
प्राणवायू कुटुंबा देई
तीच मंगल तुळस तू…
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
व्यापलीस तू सर्व क्षेत्रे
गाठलीस शिखरे यशाची !
कर्तव्याचा सदा राहून तत्पर
लेख शोभसी जिजाऊ, सावित्रीची!!
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
नव्या युगात वाहिले वारे स्त्रीमुक्तीचे !
संघर्ष पदोपदी केला अन् मिळवले जे न्याय हक्काचे !!
हर क्षेत्रात स्थान मिळवले अव्वल दर्जाचे !
स्त्रीचा सन्मान करणे हेच खरे लक्षण पुरुषार्थाचे !!
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
स्वीकारून लेण हे मातृत्व !
अंगी उपजत गुण असे दातृत्व !!
धीराने करी हर घडी नेतृत्व !
अनमोल आहे महिलांचे श्रेष्ठत्व !!
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
चूल आणि मूल आता जग बदललय
आजच्या स्त्रीने स्वातंत्र्य निवडलय.
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
थेंबा थेंबा मधून येथे
सामर्थ्याचा सागर व्हावा
विश्वाच्या कल्याणासाठी
स्त्रीशक्तीचा जागर व्हावा
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
स्त्री मनाची विशालता कळायला,
मन विशाल असावं लागतं !
डबक्यात राहून सागर दिसत नसतो,
त्यासाठी बाहेर यावं लागतं !
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
घरा स्वर्ग बनवी तू
अन्नपूर्णा तूच आहे…
तुटक्या झोपडीस महाल करी
हरहुन्नरीचे तू प्रतिक आहे…
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
अब्रू राखण्या ना कृष्ण आता
दंड देण्यास ना शिवबा आहे…
उठ, उठ घे तलवार हाती
सहनशीलता अन् शौर्याचे तू गीत आहे…
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
जरी दिसशी नाजूक, सुकुमार तू
इथे कमजोर कोण आहे…
तूच सकळाची दिशादर्शनी
अन् विश्वाची तू आस आहे…
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
जिच्या उदरातून जन्म घेते दुनिया सारी,
त्या विश्वशक्तीचे नाव आहे नारी !
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
तीच आहे सृजनाची निर्मिती,
तिच्यामुळे तेवतात दिव्यातील वाती,
चहूकडे प्रकाश देऊनी जगतास ती उध्दारी !
त्यो विश्वशक्तीचे नाव आहे नारी !
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
ज्योतिबांची ती क्रांतिज्योती सावित्री
त्यागाची प्रतीक ती शिवबाची जिजाई,
भीमरावांची सावली, ती रमाई,
रणांगणांवर लढते जशी राणी लक्ष्मी
त्या विश्वशक्तीचे नाव आहे नारी!
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
नारी को निंदो नही
नारी नर की खाण !
जिस खाण मे पैदा हुए
राम-कृष्ण-हनुमान !!
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
कोमल हैं, कमजोर नही
शक्ती का नाम ही नारी है !
जग को जीवन देनेवाली
मौत भी इससे है हरी !!
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
ऐ औरत तुझे क्या कहू,
तेरी हर बात निराली है.
तू एक ऐसा पौधा है, जिस घर रहे,
वहा हरियाली ही हरियाली है!
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
मा मेरी, अभिमान है तू,
बहन मेरी, शान है तू,
नारी तू अबला नाही,
सहनशीलता की पहचान है तू!
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
जर तुम्हाला महिला दिनाची घोषवाक्य पाहिजे असतील तर खालील चित्राला टच करा.
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
No comments:
Post a Comment