⚜️ राज्याची नजर ⚜️
बांगलादेशाच्या राजाने बिरबलाची बरीच कीर्ती ऐकली होती. बिरबलाची समक्ष भेट व्हावी व त्याच्या चातुर्याची परीक्षा घ्यावी म्हणून त्याने अकबर बादशहाला पत्र लिहिले व बिरबलाला आपल्या भेटीसाठी पाठविण्याचे विनंती केली. ही विनंती अकबर बादशहाणी मोठ्या आनंदाने कबूल केली. व त्याप्रमाणे बिरबलाला चार दिवस बांगलादेशाला सहल करण्यासाठी आणि त्यातल्या राजाची भेट घेण्यासाठी पाठविले. बांग्लादेशच्या राजाने बिरबलाची परीक्षा घेण्यासाठी स्वतः सारखे दिसणारे अजून चार जण गोळा केले. व त्या सर्वांना हुबेहूब राजासारखीच उंची वस्त्रे घालण्यास दिली. पाच सिंहासनावर खरा राजा व चार तोतेये राजे बसले. व नंतर बिरबलाला आत येण्यास सांगितले.
बिरबल आत आल्यावर त्यांनी क्षण दोन क्षण सर्वांकडे पाहिले. व नंतर सरळ खऱ्या राजासमोर जाऊन त्यास हात मिळवला. राजा आश्चर्याने थक्क झाला. व त्याने विचारले 'बिरबल आम्ही सर्वजण वेशभूषा, रंगभूषा करून हुबेहूब एकसारखे दिसत असतानाही तू खरा राजा आहे हे कसे काय ओळखले?'
बिरबल उत्तरला हे तर अगदी सोपे होते. महाराज, बाकीचे सर्व केवळ कपडे घालून राजे झाले होते. पण मनाने ते तुमचे नोकर असल्याने ते अवघडून व खांदे झुकून बसले होते. पण तुम्ही खरे राजे असल्यामुळे ताट बसला होता व तुमची नजर सरळ माझ्या डोळ्यांना डोळे देत होती. या उलट या चारी तोतया राजांच्या नजरा तुमच्याकडे लागल्या होत्या.
बिरबलाचे बारीक निरीक्षण व तर्क ज्ञानाची अचूकता लक्षात घेऊन बांगलादेशाच्या राजाने त्यास हिरे ,मोती व एक मुकुट अर्पण करून सत्कार केला.
🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️
तुम्हाला जर इतर बोधकथा वाचायच्या असतील तर खालील बटनाला टच करा.
No comments:
Post a Comment