⚜️ वसुबारस ⚜️
दिवाळी सणाची सुरुवात ही वसुबारस या सणाने होते.
आपल्याला मराठी सणात संस्कृती बद्दल आणि साजरे करत असलेल्या सणांबद्दल ज्ञान असणे आवश्यक आहे आपल्या ज्ञानात, स्वतःच्या कामाचा वस्तूंचा आणि सजीवांचा समावेश होत असतो. त्याबद्दल कृतज्ञता म्हणून महाराष्ट्रात प्रत्येक सण साजरा केला जातो. त्याचीच एक प्रचिती म्हणजे दिवाळी सणाचा पहिला दिवस वसुबारस. महाराष्ट्रात वसुबारस या दिवसापासून दिवाळीची खरी सुरुवात होते.
भारतात दिवाळी हा सण खूप प्रसिद्ध आहे आणि तो मोठ्या थाटाने साजरा केला जातो. विविध राज्यातील संस्कृती प्रमाणे दिवाळी साजरी केली जाते. महाराष्ट्रात दिवाळी साजरी करण्याची प्रथा पूर्वीपासून चालत आलेली आहे. महाराष्ट्र हे शेतीप्रधान राज्य आहे तसेच गाई गुरे, जनावरे यांनाही प्रत्येक घरात महत्त्वाचे स्थान आहे. गाई तसेच इतर जनावराबद्दल कृतज्ञता दाखवण्याचा दिवस म्हणजे वसुबारस. म्हणजेच दिवाळी सुरू होण्याचा पहिला दिवस.
वसुबारस हा दिवस अश्विन महिन्यातील कृष्ण द्वादशी साजरी केली जातो. या द्वादशीस गोवस्य द्वादशी असे देखील म्हटले जाते. वसु या शब्दाचे पूर्ण अर्थ सांगितला जातात वसु म्हणजे सूर्य व सु म्हणजे कुबेर, वसु म्हणजे धन, आणि सर्वात महत्त्वाचा अध्यात्मिक अर्थ म्हणजे 'सर्वांमध्ये वास करणारा' असा आहे आणि बारस म्हणजे द्वादशीचा दिवस.
गाई हा हिंदू संस्कृतीतील पवित्र प्राणी आहे. त्याची उपासना करण्याचा भारतात इतिहास आहे. वसुबारस या दिवशी गायीच्या तिच्या पाडसासह आणि आता तर त्याच्यासोबत इतरही प्राण्यांची ही सायंकाळी पूजा केली जाते. सौभाग्यवती स्त्रिया या सणाला वासरासह उभ्या असलेल्या गाईचा सन्मान म्हणून पुरणपोळीचा नैवेद्य गाईला आणि वासराला खाऊ घालतात.
त्या अगोदर गाईच्या व वासराच्या पायावर पाणी घालून व त्याचबरोबर हळदीकुंकू वाहून त्याची आरती ओवाळणी जाते. वसुबारस या दिवशी ज्यांच्या घरी काही गुरे आहेत त्या घरी लवकर उठून रांगोळी काढली जाते. सर्व देवतांचे आणि तुळशीचे पूजन केले जाते. काही ठिकाणी या दिवशी दुधाचे पदार्थ खाल्ले जात नाहीत. वसुबारस हा दिवस म्हणजे दिवाळीची सुरुवात असल्याने पुरणपोळीचे जेवण बनवले जाते. काही स्त्रिया गरज वाटल्यास या दिवशी उपवास देखील करतात. वसुबारस या दिवसानंतर धनत्रयोदशी, नरक चतुर्दशी, बलप्रतिपदा, लक्ष्मीपूजन, पाडवा आणि भाऊबीज असे दिवस दिवाळी या सणात साजरे केले जातात. संपूर्ण रोषणाईने आसमंत उजळून टाकणारा हा सण आणि त्यामध्ये वसुबारस या दिवसांनी होणारी सुरुवात म्हणजे सर्वत्र अल्हाददायक वातावरण असते. तसेच या मंगल दिनी सर्वजण विविध देवतांची ,कुलदेवतांची ,ग्रामदैवतांची या सर्वांची उपासना करतात.
🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️
तुम्हाला जर दिवाळी हा निबंध वाचायचा असेल तर खालील टच करा.
No comments:
Post a Comment