सामान्य ज्ञान प्रश्न उत्तरे
सामान्य ज्ञान प्रश्न उत्तरे : आजच्या स्पर्धेच्या युगात आपले ज्ञान अद्ययावत ठेवण्यासाठी आणि स्पर्धेत टिकून राहण्यासाठी हळूहळू अभ्यासाव्यतिरिक्त व्यावहारिक ज्ञान मिळवणे ही काळाची गरज आहे. आपल्या आजूबाजूला घडणाऱ्या महत्त्वाच्या घटना ज्याचे ज्ञान आपणास असणे गरजेचे आहे.
यासाठी आपले सामान्य ज्ञान अद्यावत असणे गरजेचे आहे.
आपण सशक्त आणि समृद्ध भारताचे स्वप्न पाहत आहोत. मात्र यासाठी सर्व विद्यार्थ्यांनी आवश्यक ज्ञान आत्मसात केले पाहिजे.
आपणास जर या स्पर्धेच्या युगात शिकायचे असेल तर सामान्य ज्ञान असणे खूप महत्त्वाचे आहे यासाठी आपण विद्यार्थ्यांसाठी पंधरा प्रश्न घेऊन आलेलो आहोत व त्याची उत्तरेही.
प्र. 1. आपला भारत देश कधी स्वतंत्र झाला ?
1) २६ जानेवारी
2) १५ ऑगस्ट
3) ८ ऑगस्ट
4) २ ऑक्टोबर.
प्र. 2. भारताचे संविधान तयार करण्याचे काम ज्या प्रतिनिधीसभेने पार पाडले तिला काय म्हणतात ?
1) राज्यसभा
2) लोकसभा
3) संविधान
4) संविधान सभा.
प्र. 3. संविधानातील नियमानुसार आपल्या देशाचा कारभार कधी सुरू झाला ?
1) २६ जानेवारी १९५०
2) १५ ऑगस्ट १९४७
3) एक मे 1942
4) यापैकी नाही.
प्र. 4. संविधान तयार करण्याच्या कामाला सुमारे किती वर्षे लागली ?
1) दोन
2) तीन
3) चार
4) पाच.
प्र. 5. वयाची किती वर्षे पूर्ण झालेली व्यक्ती मतदान करू शकते ?
1) सतरा
2) सोळा
3) अठरा
4) वीस.
प्र. 6. खालीलपैकी कोणती गोष्ट राष्ट्रीय प्रतीके नाहीत ?
1) चलनी नोटा
2) राष्ट्रगीत
3) राष्ट्रध्वज
4) राजमुद्रा.
प्र. 7. राष्ट्रध्वज लावताना नेहमी कोणत्या रंगाचा पट्टा वरच्या बाजूला असला पाहिजे ?
1) पांढरा
2) निळा
3) केशरी
4) हिरवा.
प्र. 8. राष्ट्रध्वजाच्या शेजारी दुसरा कोणताही ध्वज उभा करायचा झाल्यास तो राष्ट्रध्वजाच्या कोणत्या बाजूला असतो ?
1) उजव्या
2) डाव्या
3) समोरच्या
4) मागच्या.
प्र. 9. पुढीलपैकी कोणत्या गोष्टीवर राजमुद्रा असते ?
1) चलनी नोटा
2) पोस्टाची तिकिटे
3) सरकारी मोहर
4) सर्व पर्याय बरोबर.
प्र. 10. आपल्या देशाची राजमुद्रा येथील अशोकस्तंभावरून घेतलेली आहे.
1) सोमनाथ
2) सारनाथ
3) अमरनाथ
4) केदारनाथ.
प्र. 11. राष्ट्रगीतामधून आपण कोणाचा जयजयकार करतो ?
1) भाषेचा
2) देशातील लोकांचा
3) नेत्यांचा
4) भारतमातेचा.
प्र. 12. स्वातंत्र्याचा मूलभूत हक्क म्हणजे काय ?
1) सार्वजनिक जागेत मनाला वाटेल तेथे उठणे, बसणे, गोंधळ घालणे.
2) लोकांना इतरत्र फिरण्यास प्रतिबंध करणे.
3) मनाला येईल तसे चार लोकांत बोलणे.
4) स्वतःच्या विचारांची मुक्तपणे अभिव्यक्ती करणे व देशाच्या कोणत्याही भागात स्थायिक होणे.
प्र. 13.--------- वर्षे वयाखालील मुलांना कठीण व जोखमीची कामे कायदयानुसार देता येत नाहीत.
1) १४
2) २१
3) १८
4) १६.
प्र. 14. आपल्याला सरकारी कागदपत्रांवर पहायला मिळते.
1) राजमुद्रा
2) राष्ट्रीय पक्षी
3) राष्ट्रीय प्राणी
4) लोकमान्य टिळकांचे चित्र.
प्र. 15. कळसूबाई शिखराची उंची किती आहे ?
1) १६८० फूट
2) २१०० मीटर
3) २१०० फूट
4) १६५० मीटर.
प्र. 16. गोदावरी नदी कोठे उगम पावते ?
1) महाबळेश्वर
2) गंगोत्री
3) त्र्यंबकेश्वर
4) भीमाशंकर.
प्र. 12. स्वातंत्र्याचा मूलभूत हक्क म्हणजे काय ?
1) सार्वजनिक जागेत मनाला वाटेल तेथे उठणे, बसणे, गोंधळ घालणे.
2) लोकांना इतरत्र फिरण्यास प्रतिबंध करणे.
3) मनाला येईल तसे चार लोकांत बोलणे.
4) स्वतःच्या विचारांची मुक्तपणे अभिव्यक्ती करणे व देशाच्या कोणत्याही भागात स्थायिक होणे.
No comments:
Post a Comment