🏫 शाळा पूर्वतयारी घोषवाक्य 🏫
शाळा पूर्वतयारी फेरीमध्ये घोषणा देण्यासाठी सुंदर सुंदर घोषवाक्य...
⚜️ जिल्हा परिषद शाळेचा एकच ध्यास, विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास
⚜️ गुणवत्तापूर्ण शिक्षणाचा वसा, बनेल समृद्ध महाराष्ट्राचा ठसा
⚜️ शिक्षणाची किमया न्यारी, ज्ञान पोहोचेल घरोघरी
⚜️ मुलगा मुलगी एक समान, देऊ त्यांना शिक्षण छान.
⚜️ तुमचा आमचा एकच विचार, शिक्षणाचा करू प्रसार.
⚜️ जबाबदार पालकाचे एकच लक्षण, मुलांना देऊ उत्तम शिक्षण.
⚜️ शिक्षण आहे अशी शिडी, ज्यातून घडेल उज्ज्वल पिढी.
⚜️ नका करू बहाणे, शिक्षण घ्या जोमणे.
⚜️ अक्षर गिरवू, साक्षर होऊ
⚜️ बालकांना देऊ उत्तम शिक्षण, देशाचे मग होईल रक्षण
⚜️ झाली झाली शाळा सुरु, आता सगळे हसू खेळू
⚜️ चला चला शाळेत जाऊ, नका कोणी घरी राहू.
⚜️ शिक्षण शिक्षण कथासाठी, आपल्या सर्वाच्या भल्यासाठी
⚜️ सहज शिकावे हसत हसत, सहज हसावे शिकत शिकत.
⚜️ नाही कुणी घरी राहायचं, सर्वांनी आता शाळेत यायचं.
⚜️ शिक्षणाची संधी वंचितांना देवू, विकासाची गंगा घरोघरी नेऊ.
⚜️ ध्यस घ्यावा शिक्षणाचा, विकास होईल गावाचा.
⚜️ शेतीला पिकवू, मुलीला शिकवू
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
तुम्हाला जर शाळा पूर्व तयारी हिंदी घोषवाक्य पाहिजे असतील तर खालील बटनाला टच करा.
No comments:
Post a Comment