भगवान महावीर जयंती माहिती
भगवान वर्धमान महावीर हे जैन धर्माचे गुरु प्रवर्तक व तीर्थकर होते. जैन धर्मीय महावीर जयंती मोठ्या श्रद्धेने आणि उत्साहाने साजरी करतात. महावीर स्वामींचा जन्म बिहार राज्यातील वैशाली जिल्ह्यात असलेल्या कुंडग्राम या गावामध्ये झाला. कुंडग्राम हे त्यावेळी क्षत्रियांचे प्रजासत्ताक होते. महावीरांचे वडील कुण्डग्रामचे प्रमुख राज्यकर्ते होते. भगवान महावीरांचे मन मात्र राजविलासात रमले नाही. त्यांनी जगाला अहिंसा व अपरिग्रह याची शिकवण दिली. एखाद्यास आपली गरज भासली आणि शक्य असूनही आपण मदत केली नाही तर ती एक प्रकारे हिंसाच आहे असे महावीर म्हणत असत. महावीर स्वामीजी अहिंसा सत्य अस्तेय अपरिग्रह आणि ब्रह्मचर्य या पाच तत्वांची शिकवण जगाला दिली. त्याचप्रमाणे त्यांनी चोटी मोह द्वेष निंदा असत्य राग असंयम इत्यादी 18 पापे सांगितली. त्यांचा त्याग करावा असेच सुचवले . त्याग संयम प्रेम करुणा शील व सदाचार त्यांच्या प्रवचनाचे सार होते. देशभर फिरून त्यांनी आपल्या संदेशाचा प्रसार केला. कार्तिक कृष्ण अमावस्येला बिहारमधील पावापुरी येथे वयाच्या 72 व्या वर्षी त्यांचे निर्वाण झाले.
🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️
प्रश्न उत्तरे
प्रश्न जैन धर्मामध्ये एकूण किती तीर्थकर झाले आहेत?
उत्तर 24
2} जैन धर्माचे संस्थापक कोण आहेत?
महावीर स्वामी
3} महावीर स्वामी यांचा जन्म कोठे झाला होता?
उत्तर कुण्डग्राम
4} भगवान महावीर यांचा जन्म कोणत्या क्षत्रिय गोत्र मध्ये झाला होता
उत्तर ज्ञातृक
5} भगवान महावीर यांचा मृत्यू कोठे झाला होता?
उत्तर पावापुरी
6} महावीर यांचे मूळ नाव काय होते ?
उत्तर वर्धमान
7} जियो और जीने दो कोणी म्हटले होते ?
उत्तर महावीर स्वामी
8} भगवान महावीर यांचे पहिले शिष्य कोण होते?
उत्तर जमाली
9} भगवान महावीर यांच्या वडिलांचे नाव काय होते ?
उत्तर सिद्धार्थ
10} भगवान महावीर यांच्या आईचे नाव काय होते?
उत्तर त्रिशाला
11} भगवान महावीर यांच्या पत्नीचे नाव काय होते?
उत्तर यशोदा
12} भगवान महावीर यांच्या मोठ्या भावाचे नाव काय होते?
उत्तर नंदीवर्धन
13} भगवान महावीर यांना कोणत्या नदीच्या किनाऱ्यावर ज्ञानप्राप्ती झाली?
उत्तर ऋजूपालिका
14} भगवान महावीर यांच्या मुलीचे नाव काय होते?
उत्तर अन्नोजा प्रियदर्शनी
15} भगवान महावीर यांनी वयाच्या कितव्या वर्षी गृह तयार केला होता ?
उत्तर तिसाव्या वर्षी
🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️
तुम्हाला जर महावीर जयंती ऑनलाइन टेस्ट सोडवायचे असेल तर खालील चित्राला टच करा.
No comments:
Post a Comment