⚜️ गुडफ्रायडे माहिती ⚜️
गुड फ्रायडे या दिवशी येशूचे निधन झाले. लोकांच्या उद्धारासाठी येशूनी मरण पत्करले. त्या दिवसापासून हा दिवस शुभ शुक्रवार म्हणून ओळखला जातो. जीवनात सुख-दुखांचा खेळ हा उनसावलीसारखा चालूच असतो. सुख लक्षात राहत नाही, मात्र दुःख छोटे असले तरी मनी टोचत राहते.
येशूची शिकवण नुसती तोंडी नव्हती, तर त्याला कृतीची जोड होती, म्हणून ते खऱ्याखुऱ्या अधिकारवाणीने बोलू शकत होते. येशूच्या दुःख सहनाच्या संदर्भात असे मानले जाते की, आमची दुःखे त्यांनी आपल्यावर घेतली, क्लेश त्यांनी वाहिले. आमच्यासाठी देवाने त्यांस शिक्षा दिली. तसेच येशूनी देवाच्या इच्छेप्रमाणे दुःख सोसून आम्हा सर्वांसाठी पुण्य मिळवून दिले. वधस्तंभावरचे मरण हे लोकांचा उद्धार करणारे आहे, जीवनदायक आहे, हे येशूनी जाणले, म्हणून येशू महान आहेत.
🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️
इतर सणांची माहिती वाचायची असेल तर खालील बटनाला टच करा.
No comments:
Post a Comment