SANDIP GULAVE या शैक्षणिक ब्लॉगवर आपले स्वागत आहे  .

Friday, February 9, 2024

मकर संक्रांत

 ⚜️ मकर संक्रांत ⚜️


संक्रांत हे वृत आहे. इंग्रजी महिन्यांप्रमाणे १४ जानेवारीला आणि भारतीय महिन्यांप्रमाणे पौषात हा सण येत असतो. या महिन्यांत बोचरी थंडी कमी होऊ लागते. या दिवसापासून दिवस मोठा व्हायला सुरुवात होते. हा सण इतर सणांप्रमाणे विशिष्ट तिथीस येत नाही. या दिवशी मकर राशीत सूर्याचा प्रवेश होतो. म्हणूनच या दिवसाला मकर संक्रांत असे म्हणतात. याचा अर्थ हा की, या सणाचा आणि सूर्याचा संबंध आहे. कारण त्याच्या प्रकाशावर सृष्टीचे जीवन-मरण अवलंबून आहे. आरोग्य-रक्षणासाठी व रोगनिवारणासाठी सूर्याच्या किरणांसारखे उत्तम गुणकारी औषध दुसरे नाही. सूर्य हा चराचर पृथ्वीचा आत्मा आहे.

संक्रांत तशी पाहिली तर दर महिन्यात असते. जसे महीने बारा, तशा राशी बारा आहेत. सूर्य एका राशीत एक महिना असतो. एका राशीतून दुसऱ्या राशीत जाणे याला संक्रमन म्हणतात. मकर संक्रांतीचे विशेष असे की, सूर्य मकर राशीत गेल्यावर तो उत्तरेकडे कलावयास लागतो. म्हणून या सहा महिन्याला 'उत्तरायण' म्हणतात. व कर्क संक्रातीपासून मकर संक्रातीपर्यंतच्या कालास 'दक्षिणायन' म्हणतात.

या दिवशी सर्व लहान-थोर मंडळी तिळगूळ वाटतात. “तिळगूळ घ्या, गोड गोड बोला." अशा शुभेच्छा एकमेकांना देतात.

🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️

तुम्हाला जर निबंध पाहिजे असतील तर खालील चित्राला टच करा.



No comments:

Post a Comment