⚜️ रामनवमी ⚜️
क्षचैत्र महिन्यातील पहिल्या पंधरवड्यातील नवव्या दिवसाला 'रामनवमी' म्हणतात. वर्षाच्या प्रारंभीच्या महिन्यातील हा सर्वांत मोठा उत्सव. दुष्ट शक्तींनी ज्या वेळी भूजलावरील सज्जनांना त्राही त्राही करून सोडले तेव्हां त्या दुष्ट शक्तींच्या नाशासाठी श्रीविष्णूने भूतलावर अवतार घेण्याचे मान्य केले होते. हा अवतार म्हणजेच प्रभू रामचंद्र ज्याला पाहून मन रमते, आकर्षित होते, मनुष्य स्वतःला विसरून जातो, भारावून जातो, अशी व्यक्ती म्हणजे राम. या दिवशी प्रभू रामचंद्रांचा जन्म झाला.
राम हा विष्णूचा अवतार म्हणून सर्व लोक त्याला देवासमान मानू लागले . रामाची देवळे झाली. नंतर देवळात रामनवमीचा उत्सवही सुरू झाला. या दिवशी दुपारी गावातील मंडळी देवळात येतात. कथेकरींचे कीर्तन ऐकतात, त्यात ते रामजन्माची कथा सांगतात. दुपारी बारा वाजता रामाचा जन्म झाला म्हणून त्याच वेळी हा जन्मोत्सव साजरा करतात. या वेळी पाळण्यात श्रीरामाची तसबीर ठेवलेली असते. साऱ्या देशभर हा जन्मोत्सव साजरा होतो. अयोध्येत जो मोठ्या प्रमाणात होतो. राम वनवासात असताना पंचवटीत राहत होते म्हणून पंचवटीत उत्सव मोठा होतो.
🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️
तुम्हाला जर निबंध पाहिजे असतील तर खालील चित्राला टच करा.
No comments:
Post a Comment