वरिष्ठ व निवडश्रेणी ऑफलाईन पध्दतीने जिल्हा शिक्षण प्रशिक्षण संस्थांमध्ये आयोजित करणेबाबत.
वरिष्ठ व निवड श्रेणी प्रशिक्षण
विषय :- वरिष्ठ व निवडश्रेणी ऑफलाईन पध्दतीने जिल्हा शिक्षण प्रशिक्षण संस्थांमध्ये आयोजित करणेबाबत.
उपरोक्त विषयानुसार संदर्भ क्र.१ अन्वये वरिष्ठ व निवडश्रेणी प्रशिक्षणाची जवाबदारी राज्य शासनाकडून परिषदेस सोर्पावण्यात आली आहे. संदर्भ क्र.२ नुसार किमान १० दिवसांचे किंवा ५० घडयाळी तासांचे ऑनलाईन प्रशिक्षण पूर्ण करणे आवश्यक करण्यात आले. यापूर्वी कोविड १९ प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीमुळे सदर प्रशिक्षण हे ऑनलाईन स्वरुपात घेण्यात आले होते. वरिष्ठ व निवडश्रेणी प्रशिक्षण ऑफलाईन पध्दतीने घेणेबाबत संदर्भ पत्र क्र.३ अन्वये महाराष्ट्र राज्य राजपत्रित अधिकारी (डायट) संघटना यांचेकडून तसेच संदर्भ पत्र क्र. ४ ते ६ अन्वये वरिष्ठ व निवडश्रेणी प्रशिक्षण ऑफलाईन पध्दतीने घेणेबाबत क्षेत्रिय कार्यालयांकडून विनंती करण्यात आली आहे.
प्रत्यक्ष वरिष्ठ व निवडश्रेणीचे प्रशिक्षण प्रभावीपणे दिले जाऊन, प्रशिक्षणांतर्गत तज्ञांचे मार्गदर्शन व प्रशिक्षणाथीचे परस्परामधील संभाषणात्मक शैलीतून अनुभव व विचारांची देवाण-घेवाण सहजगत्या व्हावी तसेच सदर प्रत्यक्ष प्रशिक्षणाचा उपयोग शर्भाणक संवत होऊन शिक्षक अधिक सक्षम व्हावा या उद्देशाने वरिष्ठ व निवडश्रेणी प्रशिक्षणाचे आयोजन सन २०२४-२५ पासून ऑफलाईन पध्दतीने जिल्हास्तरावर (जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थांमध्ये) घेण्याचे नियोजित आहे. यार्कारता सर्व प्राचार्य, जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था यांनी ५ तज्ञ अभ्यासक/तज्ञ मार्गदर्शक यांची नावे परिषदेस दि.५ जून २०२४ पर्यंत preservicedept@maa ac in या ई-मेल आयडीवर सादर करावी. यामध्ये जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेतील वरिष्ठ अधिव्याख्याता/अधिव्याख्याता इत्यादी ३ तसेच याव्यतिरिक्त आपल्या जिल्हयातील इतर २ तज्ञ मार्गदर्शकांचे नावांचा समावेश असावा.
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
सदर परिपत्रकाची पीडीएफ डाऊनलोड करण्यासाठी खालील चित्राला टच करा.
No comments:
Post a Comment