विरामचिन्हे
![]() |
विरामचिन्हे |
जेव्हा आपण बोलत असतो, तेव्हा मध्ये मध्ये थांबतो. या थांबण्याला 'विराम' म्हणतात, लेखनामध्ये हा विराम वेगवेगळ्या खुणांनी दाखवला जातो. या खुणांना 'विरामचिन्हे' म्हणतात.
विरामचिन्हाचे महत्त्वाचे काही प्रकार खालीलप्रमाणे आहेत.
1) पूर्णविराम (.) - वाक्य पूर्ण झाले हे दाखवण्यासाठी वापरतात. उदा. माकड झाडावर चढले.
2) प्रश्नचिन्ह (?) - वाक्यात प्रश्न विचारला असेल, तर वाक्याच्या शेवटी वापरतात. उदा. तुझे नाव काय आहे ?
3) उद्गारचिन्ह (!) - मनातील भावना व्यक्त करणाऱ्या शब्दाच्या शेवटी वापरतात. उदा. बापरे! केवढा मोठा साप !
4) स्वल्पविराम (,) - दोन छोटी वाक्ये किंवा एकाच जातीचे अनेक शब्द लागोपाठ आल्यास शेवटचा शब्द वगळता त्याच्यापुढे
स्वल्पविराम (,) हे चिन्ह दिले जाते. उदा. संजयला आंबा, पेरू, केळी, चिकू ही फळे आवडतात.
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
माझ्या शैक्षणिक व्हाट्सअप ग्रुप ला जॉईन होण्यासाठी ~ CLICK HERE
No comments:
Post a Comment