⚔️ दुसरे महायुद्ध ⚔️
⚜️ 1 सप्टेंबर 1939 ला हिटलरच्या पोलंडवरिल आक्रमणाने दुसऱ्या महायुद्धास सुरुवात झाली.
⚜️ दुसरे महायुद्ध 6 वर्षे चालले
⚜️ दुसऱ्या महायुद्धात 61 देशांनी भाग घेतला. हे युद्ध जमीन, समुद्र, आकाश अशा ठिकाणी लढले गेले.
⚜️ जर्मनी, हंगेरी, इटली, जपान ही राष्ट्रे एका बाजूला व फ्रान्स, इंग्लंड, रशिया कालांतराने अमेरिका ही राष्ट्रे (मित्र राष्ट्रे) एका बाजूला असे दोन गट दुसऱ्या महायुद्धात होते.
⚜️ दुसऱ्या महायुद्धा दरम्यान जर्मन जनरल रोमेल यास डेजर्ट फॉक्स म्हटले गेले.
⚜️ इटली 10 जून 1940 ला जर्मनीच्या बाजूने युद्धात उतरले.
⚜️ जर्मनीने रशियावर 22 जून 1941 ला आक्रमण केले.
⚜️ 7 डिसेंबर 1941 ला जपानने अमेरिकेचा पर्ल हार्बर येथील नौसैनिक तळावर हल्ला केला. परिणामी 8 डिसेंबर 1941 पासून अमेरिका दुसऱ्या युद्धात सामील झाले.
⚜️ दुसऱ्या महायुद्धात जर्मनीच्या पराजयाचे श्रेय रशियाला दिले जाते.
⚜️ मित्र राष्ट्रांच्या सामूहिक प्रयत्नांमुळे 6 जून 1944 ला जर्मन सेना पराभूत झाली.
⚜️ 30 एप्रिल 1945 ला हिटलरने आत्महत्या केली.
⚜️ 7 मे 1945 ला जर्मन सेनेने आत्मसमर्पण केले.
⚜️ दुसऱ्या महायुद्धा दरम्यान इंग्लंडचे पंतप्रधान विन्स्टन चर्चिल तर अमेरिकेचे अध्यक्ष फ्रँकलिन डी रुझवेल्ट होते.
⚜️ अमेरिकेने दुसऱ्या महायुद्धात 6 ऑगस्ट 1945 ला जपानच्या हिरोशिमावर या शहरावर " लिटल बॉय " व 9 ऑगस्ट 1945 ला नागासाकी या शहरावर " फॅटमॅन " अणुबॉम्ब टाकले.
⚜️ यावेळी जपानचे पंतप्रधान ॲडमिनरल सुझुकी होते. 2 सप्टेंबर 1945 ला जपान शरण आले.
⚜️ दुसऱ्या महायुद्धात पराजित होणारे शेवटचे राष्ट्र जपान हे होते.
⚜️ दुसऱ्या महायुद्धामुळे प्रचंड जिवित व वित्तहानी झाली.
⚜️ महायुद्धाच्या दुष्परिणामामुळेच जागतिक शांततेसाठी संयुक्त राष्ट्रसंघ 1945 मध्ये न्यूयॉर्क येथे स्थापन केला गेला.
⚜️ दुसऱ्या महायुद्धाचा शेवट हा 2 सप्टेंबर 1945 ला झाला.
No comments:
Post a Comment