⚜️ मी ⚜️
मी मुलगा आहे. मी नऊ वर्षाचा आहे. माझे नाव अथर्व आहे. पण सगळेजण मला लाडाने अतू असे म्हणतात.
मी एकुलता एकच मुलगा आहे. त्यामुळे आई बाबा व आजी आजोबा माझे लाड करतात. पण त्याचवेळी मी बिघडता कामा नये अशी काळजीही त्यांना वाटत असते.
मी सकाळी सात वाजता उठतो. आई मला दूध प्यायला देते. तिला आणि बाबांना शाळेला जाण्याची घाई असते. मी आईला त्रास देत नाही. मग सगळेजण मला शहाणा मुलगा म्हणतात.
मी सकाळी उठल्यानंतर नऊ वाजता अंघोळ करून देवाला नमस्कार करतो. मग आजीने दिलेली गरमागरम पोळी आणि एखादे फळ खाऊन थोडा वेळ गृहपाठ करतो. मग डबा घेऊन शाळेला जातो.
शाळेत दिवसभर अभ्यास झाल्यावर संध्याकाळी घरी येऊन बाहेर खेळतो. रात्री आम्ही सगळे एकत्र गप्पा मारत जेवण करतो. रात्री झोपताना कधी कधी आजोबा तर कधी आजी मला गोष्ट सांगतात. मी लवकर झोपावे म्हणून घरातले सगळे लोक टीव्ही जास्त पाहत नाहीत. आणि मलाही पाहू देत नाहीत.
मी शाळेत आणि घरात सर्वांचा लाडका मुलगा आहे.
🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️
इतर निबंध वाचण्यासाठी खालील बटनाला टच करा.
⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️
No comments:
Post a Comment