⚜️ सम व विषम ⚜️
समसंख्या ~ ज्या संख्येच्या एककस्थानी 0 , 2 , 4 , 6 किंवा 8 हा अंक असतो, त्या संख्येला समसंख्या म्हणतात.
उदाहरण👉 36 , 24 , 96
विषमसंख्या ~ ज्या संख्येच्या एककस्थानी 1 , 3 , 5 , 7 किंवा 9 हा अंक असतो त्या संख्येला विषमसंख्या म्हणतात.
उदाहरण👉 63 , 27 , 91
💠 समसंख्या 💠
⚜️ दोन क्रमवार समसंख्येच्या मध्ये एक विषमसंख्या येते.
उदाहरण👉 {6 , 7 , 8 }
🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫
⚜️ कोणत्याही समसंख्येत दोन मिळवल्यास पुढील क्रमवार समसंख्या मिळते.
उदाहरण👉 {6 + 2 = 8 }
{ 12 + 2 = 14 }
🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫
⚜️ कोणत्याही समसंख्येत एक मिळवल्यास पुढील विषम संख्या मिळते
उदाहरण👉 {6 + 1 = 7 }
{ 12 + 1 = 13 }
🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫
⚜️ कोणत्याही दोन समसंख्यांची बेरीज ही समसंख्याच येते.
उदाहरण👉 {6 + 10 = 16 }
{ 12 + 20 = 32 }
🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫
⚜️ कोणत्याही दोन सम संख्यांची वजाबाकी ही समसंख्याच येते.
उदाहरण👉 { 26 - 10 = 16 }
{ 52 - 20 = 32 }
🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫
⚜️ कोणत्याही दोन सम संख्यांचा गुणाकार हा समसंख्याच येते.
उदाहरण👉 {6 × 10 = 60 }
{ 12 × 10 = 120 }
🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫
⚜️ एक अंकी समसंख्या 4 आहेत. दोन अंकी समसंख्या 45 आहेत. तीन अंकी समसंख्या 450 आहेत. चार अंकी समसंख्या 4500 आहेत.
🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫
⚜️ क्रमवार सम संख्यांची बेरीज =
पहिली संख्या + शेवटची संख्या
-----------–------------------- × एकूण संख्या
2
उदाहरण👉 42 + 44 + 46 + 48 + 50 = ?
42 + 50
------------ × 5{ संख्या }
2
92
--------- ×. 5
2
46 × 5 = 230
🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫
⚜️ दोन क्रमशः सम संख्यांचा गुणाकार हा मधल्या संख्येचा वर्ग वजा एक असतो.
उदाहरण👉 { 6 × 8 = 48 }
7 चा वर्ग वजा एक
49 - 1 = 48
🎗️🎗️🎗️🎗️🎗️🎗️🎗️🎗️🎗️🎗️🎗️🎗️🎗️🎗️🎗️🎗️
💠 विषमसंख्या 💠
⚜️ दोन क्रमवार विषमसंख्येच्या मध्ये एक सम संख्या येते.
उदाहरण👉 {7 , 8 , 9 }
🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫
⚜️ कोणत्याही विषमसंख्येत दोन मिळवल्यास पुढील क्रमवार विषमसंख्या मिळते.
उदाहरण👉 {7 + 2 = 9 }
{ 11 + 2 = 13 }
⚜️ कोणत्याही विषमसंख्येत एक मिळवल्यास पुढील सम संख्या मिळते.
उदाहरण👉 {7 + 1 = 8 }
{ 11 + 1 = 12 }
🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫
⚜️ कोणत्याही दोन विषमसंख्यांची बेरीज ही समसंख्याच येते.
उदाहरण👉 {9 + 13 = 22 }
{ 11 + 17 = 28 }
🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫
⚜️ कोणत्याही दोन विषमसंख्यांची वजाबाकी ही समसंख्याच येते.
उदाहरण👉 { 13 - 9 = 4 }
{ 17 - 11 = 6 }
🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫
⚜️ कोणत्याही दोन विषमसंख्यांचा गुणाकार ही विषमसंख्याच येते.
उदाहरण👉 {9 × 7 = 63 }
{ 11 × 9 = 99 }
🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫
⚜️ एक अंकी विषमसंख्या 5 आहेत. दोन अंकी विषमसंख्या 45 आहेत. तीन अंकी विषमसंख्या 450 आहेत. चार अंकी विषमसंख्या 4500 आहेत.
🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫
⚜️ क्रमवार विषम संख्यांची बेरीज =
पहिली संख्या + शेवटची संख्या
-----------–-----------------------. × एकूण संख्या
2
उदाहरण👉 21 + 23 + 25 + 27 + 29 = ?
21 + 29
------------ × 5{ संख्या }
2
50
---------- ×. 5
2
25 × 5 = 125
🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫
⚜️ दोन क्रमशः विषम संख्यांचा गुणाकार हा मधल्या संख्येचा वर्ग वजा एक असतो.
उदाहरण👉 { 7 × 9 = 63 }
8 चा वर्ग वजा एक
64 - 1 = 63
🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫
⚜️ क्रमशः 1 पासून सुरू होणाऱ्या विषम संख्यांची बेरीज ही वर्ग संख्या असते .
उदाहरण👉 {1 + 3 + 5 = 9 }
तीन चा वर्ग = 9
{ 1 + 3 + 5 + 7 + 9 = 25 }
पाचचा वर्ग = 25
🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️
⚜️ तुम्हाला जर दिनदर्शिका या घटकाचे महत्त्वाचे मुद्दे पाहायचे असल्यास खाली टच करा.
👇
🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️
No comments:
Post a Comment